

Chhatrapati Sambhajinagar
esakal
जायकवाडी: पैठण येथील श्री संत ज्ञानेश्वर उद्यानात पर्यटकांचा मोठा ओघ पाहायला मिळाला. ईदची सुटी आणि त्याला लागून आलेल्या रविवारमुळे तब्बल ४२०० पर्यटकांनी उद्यानाला भेट दिली.
उद्यानातील नयनरम्य हिरवळ, विविध सुविधा आणि विशेषतः रंगीबेरंगी लेझर शोचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळच्या सत्रात लेझर शो पाहण्यासाठी पर्यटकांच्या रांगा लागल्या होत्या.