esakal | पैठण तालुक्यातील ग्रामस्थांनी पाठवली पूरग्रस्तांसाठी मदत
sakal

बोलून बातमी शोधा

आडूळ (ता.पैठण) : येथील ग्रामस्थांनी पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तुंची मदत पाठविली आहे.

पैठण तालुक्यातील ग्रामस्थांनी पाठवली पूरग्रस्तांसाठी मदत

sakal_logo
By
शेख मुनाफ

आडूळ (जि.औरंगाबाद) : राज्यातील पुरग्रस्तांसाठी (Flood) रविवारी (ता.१) पैठण (Paithan) तालुक्यातील आडूळ बुद्रूक, आडूळ खुर्द, गेवराई बु. ग्रामपंचायत, व्यापारी महासंघ आडुळ व ग्रामस्थांतर्फे किराणा सामान, नवीन कपडे, वैद्यकीय साहित्यासह विविध वस्तू जमा करून मदत म्हणून पाठविण्यात आल्या. पाचोड पोलिस ठाण्याचे (Pachod Police Station) सहायक पोलिस निरीक्षकांनी ठाण्याअंतर्गत असलेल्या गावातील नागरिकांना व व्यापाऱ्यांना राज्यातील पूरग्रस्तांसाठी (Aid To Flood Affected People) जीवनाश्यक वस्तूंची मदत करावी, असे आवाहन केले होते. या आवाहनाला रविवारी आडूळ परिसरात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने थैमान घातल्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होऊन हजारो लोकांची घर पाण्याखाली गेली. शेकडो जनावरं वाहून गेली आणि वेगवेगळ्या ठिकाणी दरडी कोसळून अनेकांचा बळी गेला. ज्यांच्या घरातील माणसं दगावली त्यांच्यावर तर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला.(paithan tahsil villagers of aurangabad come forward for flood affected people glp88)

हेही वाचा: औरंगाबादेत रंगला 'फॅशन शो', पाहा PHOTOS

या संकटाच्या प्रसंगात या पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात देणं, त्यांना धीर देणं आणि त्यांचे उद्ध्वस्त झालेले संसार पुन्हा उभे करणं ही आपली जबाबदारी आहे, असे म्हणत सर्वानीच मदत करून गावात व बाजारपेठेत फिरून अन्नधान्य, बिस्किटे, मसाले, मीठ, तांदूळ, पोहे, पादत्राणे, पाणी, डाळी, साखर, साड्या, शाली, चादर, पीठ, पॅकिंग खाऊ, तेल, साखर, वैद्यकीय साहित्य, फळे, नवीन कपडे आदींसह विविध वस्तू जमा करून वाहनाद्वारे रवाना करण्यात आल्या. आडूळकरांनी सढळ हाताने दानशूर व्यक्तींनी तसेच महिला व अबाल वृद्ध नागरिकांनी सुद्धा हातभार लावला. याप्रसंगी मदत गोळा करण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे, पंचायत समिती सदस्य शुभम पिवळ, सरपंच शेख शमीम, उपसरपंच अलका बनकर, तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष रामुनाना पिवळ, शेख नासेर, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र वाघ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शेख जाहेर, कामगार नेते हारूण पठाण, पोलिस उपनिरीक्षक सुरेश माळी, सहायक फौजदार जनार्धन उबाळे, रविंद्र क्षीरसागर, विश्वजित धनवे, तात्यासाहेब गोपालघरे, संदीप पाटेकर, राहुल बनकर, पोलिस पाटील भाऊसाहेब पिवळ, माजी सरपंच रुस्तुमराव बनकर, दिलीप जैस्वाल, शितल कासलीवाल, गजानंद बोहरा, गेवराई बुद्रूकचे सरपंच ज्ञानेश्वर वाघ, पारुंडी तांड्याचे माजी सरपंच बाजीराव राठोड, शेख रिजवान, आसेफ पठाण, आडूळ खुर्दचे उपसरपंच प्रेमसिंग गुसिंगे, भाऊसाहेब कोल्हे, सुनिल पिवळ, सय्यद शाम्मद आदींनी पुढाकार घेतला.

loading image
go to top