Chhatrapati Sambhajinagar: आडूळ परिसरात पाणीटंचाईला अखेर टँकरांची दिली शिदोरी, चार टँकर सुरू; हंडाभर पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या नागरिकांसाठी प्रशासनाने टँकर सुरु केले
Water Crisis Hits Adul Village: पैठण तालुक्यातील आडूळ परिसरात पाणीटंचाईने नागरिक त्रस्त होते. हंडाभर पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या महिला, विद्यार्थी आणि वृद्धांसाठी प्रशासनाने चार टँकर सुरू केले.
आडूळ: पैठण तालुक्यातील आडूळ बु. आणि परिसरात पाणीटंचाईने रौद्र रूप धारण केले होते. ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी स्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना ५ रुपये प्रतिहंडा दराने पाणी विकत घ्यावे लागत होते.