

Thergaon Truck Accident
esakal
पाचोड: थेरगाव (ता. पैठण) येथे गळक्या ‘एअर व्हॉल्व्ह’मधून पाणी भरण्यासाठी गेलेल्या ३५ वर्षीय तरुणाला भरधाव ट्रकने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला होता. मात्र, छत्रपती संभाजीनगर येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दयानंद दानियल आहेर असे मृताचे नाव आहे. हा अपघात पाचोड-पैठण राज्य महामार्गावर गुरुवारी (ता. तीन) सकाळी सहाच्या सुमारास घडला.