

Water Shortage,News:
esakal
पैठण,: परतीच्या पावसाचे वेध लागलेले असतानाच, ऐन हिवाळ्यापूर्वी पैठण तालुक्यात भीषण पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. यंदा तालुक्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे विहिरी, कूपनलिका (बोअरवेल) आणि स्थानिक तलावांतील जलसाठे तळ गाठू लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू झाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने तालुक्यातील १८ गावांमध्ये ३० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला असून, दररोज सुमारे ५० फेऱ्यांद्वारे नागरिकांची तहान भागवली जात आहे.