

Gram Sadak Yojana
sakal
कन्नड : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारने ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे उभारण्याचे काम केले आहे. पिशोर हा स्वतंत्र तालुका करण्यासाठी आपण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करू, असा विश्वास पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी (ता. २) रोजी व्यक्त केला.