Pankaja Munde: ग्रामीण महिलांच्या मदतीसाठी पुन्हा रॅम्प वॉक करीन ;पंकजा मुंडेंचे टीकाकारांना प्रत्युत्तर; हौस नाही, पण मदतीसाठी केले तर गैर काय?

Pankaja Munde Ramp Walk : ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना व्यासपीठ आणि बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पुन्हा रॅम्प वॉक करण्याची तयारी पंकजा मुंडे यांनी दर्शवली. जालन्यातील महिलांच्या रेशीम उत्पादनांचा ‘जालनाई’ ब्रँड देशभर पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
Pankaja Munde says she is ready to walk the ramp again to promote products made by rural women.

Pankaja Munde says she is ready to walk the ramp again to promote products made by rural women.

esakal

Updated on: 

छत्रपती संभाजीनगर: राज्याच्या पर्यावरण मंत्री पकंजा मुंडे यांनी मुंबईतील एका फॅशन शोमध्ये रॅम्प वाॅक केल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. या टीकेला पंकजा मुंडे यांनी सडेतोड उत्तर दिले. ‘‘मला रॅम्प वाॅकची हौस नाही, मी एका चोवीस वर्षांच्या मुलाची आई आहे. बावीस वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहे. माझ्या जालन्यातील ग्रामीण महिलांना व्यासपीठ मिळणार असेल तर मी त्यांच्यासाठी पुन्हा रॅम्प वाॅक करीन’’, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावले.

Loading content, please wait...