esakal | भागवत कराड डॉक्टर असले, तरी मी आई आहे! पंकजा मुंडेंचा टोला | Pankaja Munde
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagwat Karad And Pankaja Munde

भागवत कराड डॉक्टर असले, तरी मी आई आहे! पंकजा मुंडेंचा टोला

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : मी डॉक्टर आहे. लहान मुलांचा डॉक्टर. मला ओबीसींच्या वेदना समजतात. मी त्यासाठी व सामान्यांसाठी कार्य करेल, या केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad) यांच्या वक्तव्यावर पंकजा मुंडे यांनी कराड डॉक्टर असतील तर मी आई आहे व आईला वेदना जास्त समजतात! असा शाब्दिक वार केला. ओबीसी जागर मेळाव्यात (Obc Reservation) डॉ. कराड यांचे भाषण झाल्यानंतर अखेरीस पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी भाषणावेळी या वक्तव्याचा समाचार घेतला. डॉ. कराड मंत्री महोदय आहेत. त्यांना डॉक्टर म्हणू नका, ते खासदार झाले तेव्हा मी कराड यांना खासदार म्हणा, असे सांगत होते. आता तर ते केंद्रीय अर्थ राज्यमंत्री झाले, त्यामुळे त्यांना आता मंत्री म्हणा, अशी कोटीही पंकजा मुंडे यांनी केली. पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत आपल्याच (Aurangabad) बालेकिल्ल्यात पराभव झाला. त्यानंतर त्या पक्षीय कार्यक्रमांना फारशा दिसल्या नव्हत्या. पक्षीय मतभेदांबाबत बरीच चर्चा रंगली होती. यानंतर अनपेक्षितपणे डॉ. भागवत कराड यांना खासदारकी मिळाली.

हेही वाचा: निवडणुकांमध्ये अन्याय खपवून घेणार नाही, पंकजा मुंडेंचा इशारा

त्यानंतर केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदही मिळाले. परंतु, त्यानंतर पंकजा मुंडे समर्थकांत नाराजी दिसून आली होती. याची प्रचीती जनआशीर्वाद यात्रेवेळी आली होती. या यात्रेनंतर ओबीसी जागर मेळाव्यात आज उभय नेते एकत्र दिसून आले; पण व्यासपीठावर त्यांच्यात फारशी चर्चा झाली नाही. त्यानंतर भाषणात ओबीसींबाबत वेदना असल्याची भावना व्यक्त करीत ओबीसींसाठी कार्य करीत राहणार, अशी ग्वाही डॉ. कराड यांनी दिली. पण त्यावर शाब्दिक वार करीत पंकजा मुंडे यांनी भाजपमधील आपणच ओबीसींच्या नेत्या असल्याची जाणीव भाषणातून करून दिली.

डॉ. कराड, पंकजा मुंडे चार हात दूर!

पंकजा मुंडे या जागर मेळाव्याच्या प्रमुख पाहुण्या होत्या. त्यामुळे त्या मधोमध बसल्या होत्या. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून त्यांच्यासोबतच मध्यभागी डॉ. कराड बसणे अपेक्षित होते; पण दोघांमध्ये तीन इतर नेते बसले होते. त्यानंतर डॉ. कराड चौथ्या खुर्चीवर बसलेले होते!

हेही वाचा: रुग्णांची फसवणूक केल्याने डाॅ.शेंडगे, लॅबचालक बनसोडेंवर गुन्हा दाखल

मुलांना जात माहीत असणे चांगले नाही

आम्ही जेव्हा महाविद्यालयात होतो तेव्हा जात विचारली तर माहीत नसायची; पण आता लहान मुलांनाही जात माहीत असते. माझा भाचा,प्रीतमताईंच्या मुलाला आमच्या घरातील सर्व काम करणाऱ्यांची जात माहीत आहे. मुलांना जात माहीत होणे हे काही चांगले चित्र नाही. अन्याय, लढा, रस्त्यावर होणाऱ्या आंदोलनामुळे जाती लोकांना माहीत होतात. येत्या दहा वर्षांत जात विसरून जावी, अशी अपेक्षाही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.

loading image
go to top