esakal | निवडणुकांमध्ये अन्याय खपवून घेणार नाही, पंकजा मुंडेंचा इशारा |Pankaja Munde In Aurangabad
sakal

बोलून बातमी शोधा

Pankaja Munde

निवडणुकांमध्ये अन्याय खपवून घेणार नाही, पंकजा मुंडेंचा इशारा

sakal_logo
By
गणेश पिटेकर

औरंगाबाद : येणाऱ्या निवडणुकांमध्ये अन्याय खपवून घेणार नाही, असा इशारा भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. आज औरंगाबाद येथे भाजपच्या ओबीसी जागर मेळावा (OBC Reservation) पार पडला. त्यात त्या बोलत होत्या. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, प्रवीण घुगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मुंडे म्हणाल्या, की आरक्षणाचा (Aurangabad) लढा जे अशक्त आहेत त्यांच्यासाठी आहे. जात नाही ती जात. ताकद देण्यासाठी जात आहे. या देशात अनेक राज्ये आहेत. मोदींनी सर्वणांना दहा टक्के आरक्षण दिल्याचे त्यांनी सांगितले. हे सरकार सत्तेत आल्यावर ५० टक्के ओबीसींचे आरक्षण रद्द झाले आहे. कोर्टामध्ये बाजू मांडू.

हेही वाचा: कर्ज अन् अतिवृष्टीमुळे आशा संपली, शेतमजुराने घेतले विषारी औषध

वंचितांना, पीडितांना सामान्यांना न्याय देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनाी आरक्षण दिले. ४२ वर्षांपासून लढा चालू आहे. मराठा समाजाच्या पाठित खंजीर खूपण्याचे कामही त्यांनीच केले. राजकीय भविष्य काय आहे. मराठा सामाजाची मागणी शिक्षण, रोजगारामध्ये आरक्षण हवी. ती पूर्ण झालीच पाहिजे, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.

loading image
go to top