esakal | पंकजा मुंडे यांचे उपोषण भाजपकडून हायजॅक; शिवसेनेचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

amc aurangabad

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे सोमवारचे (ता. 27) उपोषणात सहभागी होत संस्टबाजी करत हे उपोषण हायजॅक केले, असा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, आमदार अंबादास दानवे यांनी मंगळवारी (ता. 28) केला. 

पंकजा मुंडे यांचे उपोषण भाजपकडून हायजॅक; शिवसेनेचा आरोप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद-राज्यात गेली पाच वर्षे सत्ता असताना भाजपच्या लोकांनी कधी सिंचनाचा विषय कधी मांडला नाही. बैठकांना ते कधी आले नाहीत; मात्र भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे सोमवारचे (ता. 27) उपोषणात सहभागी होत संस्टबाजी करत हे उपोषण हायजॅक केले, असा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, आमदार अंबादास दानवे यांनी मंगळवारी (ता. 28) केला. 

मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासह इतर प्रश्‍नांवर भाजप नेते पंकजा मुंडे यांनी सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण केले. यावेळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार प्रीतम मुंडे, माजी मंत्री महादेव जानकर, शिरीष बोराळकर, पाशा पटेल, आमदार सुजितसिंह ठाकूर, नारायण कुचे यांच्यासह भाजप नेत्यांनी हजेरी लावली.

हेही वाचा : मराठवाड्याच्या पाण्यासाठी तेव्हा पंकजा मुंडे यांनी काय केले : रमेश गायकवाड

या उपोषणावरून शिवसेना-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पंकजा मुंडे यांच्या उपोषणा संदर्भात टीका केली होती. उपोषणानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी भाजपवर टीका केली आहे. पत्रकारांसोबत बोलताना ते म्हणाले, पंकजा मुंडे यांनी पूर्वीच उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी सरकारला फक्त 12 दिवस झाले होते. मात्र पंकजा मुंडे यांनी सरकारच्या विरोधात नाही तर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करत असल्याची भूमिका जाहीर केली आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो.

राज्यात भाजपचे सरकार असताना त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी मराठवाड्याच्या पाण्यासंदर्भात, सिंचनासंदर्भात कधीच आवाज उठविला नाही. कोणत्या बैठकीला ते उपस्थित राहिले नाहीत. फक्त सरकारी योजनांबाबतच ते बोलत होत. मात्र या योजना देखील जनतेपर्यंत पोचल्या नाहीत. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील जनतेला दुष्काळात दिलासा देण्यासाठी जे काम केले ते सोमवारी मात्र पंकजा मुंडे यांचे उपोषण हायजॅक करण्यासाठी स्टंटबाजी करण्यासाठी ते हजर राहिले, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला. 
 
त्या मराठवाड्याच्या कन्या 
पंकजा मुंडे या मराठवाड्याच्या कन्या आहेत. त्या मराठवाड्याच्या विषयावर नेहमीच आंदोलन करतात. त्यांचे आम्ही अभिनंदन करतो. मराठवाड्याच्या पाणीप्रश्‍नावर मुख्यमंत्री, महाविकास आघाडीचे नेते संवेदनशील आहेत, असेही श्री. दानवे यांनी नमूद केले.

हेही वाचा : फडणवीस यांनी बुट हातात का घेतले ? काय आहे कारण

loading image