

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: शहानूरमियाँ दर्गा रोडवर सुरू असलेल्या ड्रेनेज लाइनच्या कामासाठी महापालिकेच्या कंत्राटदाराने मशीनद्वारे निष्काळजीपणे खोदकाम केले. त्यामुळे शुक्रवारी (ता. तीन) सकाळी साडेअकराच्या सुमारास महावितरणच्या दोन उच्चदाब भूमिगत वीजवाहिन्या तुटल्या. त्यामुळे पन्नालालनगर उपकेंद्रावरील सुमारे १५ हजार ग्राहक आठ तास घामाघूम झाले. रात्री ८ः१५ वाजता वीजपुरवठा सुरळीत झाला.