Parbhani News: खतांचा साठा कागदोपत्री; शेतकरी हवालदिल; ‘सकाळ’च्या स्टिंगमध्ये खत टंचाईचे वास्तव उघड

Farmers Struggle Despite Official Availability: परभणीत खताचा कागदोपत्री साठा असूनही शेतकऱ्यांना खरेदीसाठी भटकंती; युरिया व DAP खत महागात व ‘लिंकिंग’ची सक्ती उघड.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

परभणी: जिल्ह्यात खताचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे प्रशासनाची अधिकृत आकडेवारी सांगत असले तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना खतासाठी भटकंती करावी लागत असल्याचे वास्तव ‘सकाळ’ने केलेले स्टिंगमध्ये समोर आले आहे.

जिल्हा परिषद कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यासाठी ५५ हजार ८५० मेट्रिक टन खताची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यापेक्षा अधिक म्हणजे ६६ हजार ८५० मेट्रिक टन खत मंजूर झाले असून आतापर्यंत ६० हजार ७२८ मेट्रिक टन खताची विक्री झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हा साठा कागदोपत्रीच असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com