
सेलू : सेलू-वालूर रस्त्यावर राजेवाडी गावाजवळील दुधना नदीवरील पुलावरून जात असताना दोन दुचाकीस्वार मंगळवारी (ता. १९) दुपारी चारच्या सुमारास वाहून गेले. निम्न दुधना प्रकल्पातून सोमवारी (ता. १८) आठ दरवाजांमधून विसर्ग सुरू झाल्याने नदीला पूर आला होता. त्यामुळे पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. तरीदेखील छबूराव जावळे (५०, रा. गुळखंड) आणि मारुती रामभाऊ हरकळ (४५, रा. वालूर) दोघे दुचाकीवरून जात असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.