
फुलंब्री : अंधारी येथून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी रुग्णवाहिका एका मेंढीला उडवून दुभाजकाला धडकली. या अपघातात रुग्णवाहिकेतील अर्धांगवायूग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला. तर, पाचजण जखमी झाले. ही घटना छत्रपती संभाजीनगर ते जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील खामगाव फाट्यावर गुरुवारी (ता. ७) रात्री साडेसातच्या सुमारास घडली.