छत्रपती संभाजीनगर - महापालिका निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. याच तयारीचा भाग म्हणून निवडणूक कामासाठी मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे..दरम्यान, महापालिका प्रशासनाने चक्क दिवंगत शिक्षकांना निवडणुकीचे काम सोपविल्याचा प्रकार उघडकीस आला. या शिक्षकांच्या नावाने निवडणूक प्रशिक्षणासाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षकसेनेने संताप व्यक्त केला.पैठण तालुक्यातील संभाजी कर्डिले आणि राजेश बसवे या दिवंगत शिक्षकांनाच निवडणुकीच्या ड्यूटीवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. मृत व्यक्तींनाही आदेश पाठवण्याइतका निष्काळजी कारभार प्रशासनाने केला आहे. इतकेच नव्हे तर बदली झालेले शिक्षक सध्या आपल्या मूळ शाळेपासून तब्बल १५० किलोमीटर अंतरावर कार्यरत असतानाही त्यांना जुन्याच शाळांवर निवडणूक आदेश देण्यात आले आहेत..धक्कादायक बाब म्हणजे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून आधीच निवडणूक प्रक्रियेत कार्यरत असलेल्या शिक्षकांनाही पुन्हा मनपा निवडणुकीच्या ड्यूटीचे आदेश देण्यात आले आहेत. पैठण तालुक्यातील जवळपास साडेतीनशे बीएलओंना थेट महानगरपालिका निवडणुकीचे आदेश मिळाले आहेत. वैजापूर तालुक्यात सध्या कार्यरत असलेले राहुल गिरगे यांनाही त्यांच्या पूर्वीच्या पैठण तालुक्यातील शाळेवर ड्यूटीचे आदेश पाठवण्यात आले आहेत..मनपा उपायुक्तांना निवेदनया सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर सेनेच्यावतीने मनपा उपायुक्त राहुल सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. दिवंगत शिक्षक, बदली झालेले शिक्षक, आजारी शिक्षक तसेच आधीच निवडणूक कर्तव्यावर असलेले व बीएलओ म्हणून कार्यरत शिक्षक यांचे निवडणूक आदेश तत्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली..निवेदनावेळी राज्य उपाध्यक्ष सोमनाथ जगदाळे, राज्य मुख्य समन्वयक दीपक पवार, राज्य प्रसिद्धिप्रमुख महेश लबडे, जिल्हाप्रमुख अमोल एरंडे यांच्यासह शिक्षक सेना व शिक्षकेतर सेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते..महानगरपालिका निवडणुकीत पहिल्यांदाच जिल्हा परिषद शिक्षकांची ड्यूटी लावण्यात आली आहे. मात्र, निवडणूक विभागाने अद्ययावत माहिती न वापरता जुना डाटा वापरल्यामुळे हा गोंधळ झाल्याचे दिसत आहे. बदली झालेले शिक्षक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, आजारी तसेच आधीच निवडणूक कर्तव्यावर असलेल्या शिक्षकांना या ड्युटीतून तत्काळ वगळण्यात यावे. प्रशासनाने ही चूक दुरुस्त न केल्यास शिक्षक संघटना तीव्र आंदोलन करण्यास मागे-पुढे पाहणार नाही.- अमोल एरंडे, जिल्हाप्रमुख, शिक्षक सेना.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.