Aurangabad : अवैधरित्या मद्यसेवन करणाऱ्यांना दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Penalty For illegal liquor drinking

Aurangabad : अवैधरित्या मद्यसेवन करणाऱ्यांना दंड

औरंगाबाद : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकातर्फे मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बीड बायपास रोडवरील हॉटेल न्यू स्वराज येथे छापा टाकण्यात आला. यात सात जणांना अवैधरित्य मद्यसेवन करताना रंगेहात पकडण्यात आले. या करावाईत ३२ हजाराचा मुद्दे माल जप्त करण्यात आला.

तर या सहा जणांना न्यायालयात हजर केले असता त्यांना १५ हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला.अशी माहिती भरारी पथकाचे निरिक्षक एल.व्ही.पाटील यांनी दिली. श्री. पाटील म्हणाले, की राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, मुंबईचे संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत ढाबाचालक शिवाजी भानुदास नजन, रा.वरवंडी, ता पैठण, यांच्यासह श्रीकांत कुलकर्णी(खुलताबाद), प्रकाश शाम उपाध्याय (ब्रिजवाडी,चिकलठाणा), अभिमन्यू चौबे, (तांदुळवाडी, तां. गंगापूर), किरण वाघ,(रमानगर क्रांती), अमोल प्रसाद कांबळे (नागसेनगर, उस्मानपुरा), योदेश उमाशंकर मिटकर (म्हाडा,कॉलनी देवळाई) यांना ताब्यात घेण्यात आले होते.

या कारवाईत ३२ हजारांचा मुद्दे माल जप्त करण्यातताला होता. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायलयात हजर केले असता, प्रत्येक मद्यपींना २५०० असा एकूण १५ हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला. गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक एल.व्ही.पाटील, बी. ए. राख दुय्यम निरिक्षक, व्ही.एस.वरठा, दुय्यम निरिक्षक बी.बी. चाळणंवाड, डी.एस.साळुंके, डी.पी.लघाने, मोतीलाल बहुरे,आशपाक एन.शेख हे काम पाहात आहेत.