

औरंगाबाद: काही दिवसांपुर्वी जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला होता. सध्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या लक्षणीय घटली आहे. तरी प्रशासन काळजी घेण्याचे आवाहन करत आहे. तसेच लसीकरणासाठी ( covid 19 vaccination) आवाहन करत आहे पण शहरातील नागरिकांचा लस घ्यायला उत्साह दिसत नाहीये. त्यामुळे नागरिक इथून पुढे न लस घेता बाजारात फिरले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं प्रशासनाने सांगितले आहे.
राज्यात एकीकडे लसीसाठी ४५ वर्षांच्या पुढील नागरिक रांगा लावत आहेत पण औरंगाबादकरांमध्ये लसीकरणाबद्दल निरुत्साह दिसत आहे. विशेष म्हणजे शहरात २० हजारांपेक्षा जास्त लसींचे डोस शिल्लक आहेत. यामुळे जर ४५ वर्षांपुढील व्यक्ती लस न घेता बाजारात किंवा रस्त्यावर आढळल्यास त्यांच्यावर महापालिका दंडात्मक कारवाई करणार आहे. औरंगाबादमध्ये १.५ ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली आहे. तरी आणखी ३ लाख ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली नाही.
हा दंड करण्यामागे महापालिकेचा सर्व नागरिकांनी लवकरात लवकर लस घेणे हा आहे. कारण तिसरी लाटेच्या अगोदर सर्वांचे लसीकरण झाले तर ते औरंगाबादकरांसाठी फायद्याचे असणार आहे. शहरात सध्या मोठ्या प्रमाणात लसी शिल्ल्क असून प्रशासनाकडून लस घेण्यासाठी आवाहन केले जात आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.