
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास कंत्राटी कर्मचारी पुरविणाऱ्या पहिल्या एजन्सीला बाजूला करून दुसऱ्या क्रमांकाच्या सेवा पुरवठादार ‘आस्था स्वयंरोजगार सेवाभावी संस्थे’कडे काम सोपवण्यात आले. त्यामुळे चार महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेतील कंत्राटी ४४३ कर्मचाऱ्यांना मंगळवारी (ता. २६) गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला मे महिन्याचे थकीत वेतन अदा करण्यात आल्याने कर्मचारी सुखावले. दरम्यान, विद्यापीठाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचेही वेतन झाले.