
छत्रपती संभाजीनगर : शिक्षक पदाच्या भरतीत शिक्षक पात्रता चाचणीत (टीईटी) आरक्षणाचा लाभ घेतला असल्यास शिक्षक अभियोग्यता चाचणीत (टीएआयटी) खुल्या प्रवर्गातील उमेदवाराएवढे किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवले, तरी त्या प्रवर्गात स्थलांतर करण्यास प्रतिबंध घालणारी अट ही संवैधानिकदृष्ट्या घटनाबाह्य असून ती रद्दबातल ठरवावी, अशा आशयाच्या तीन याचिका दाखल झाल्या आहेत.