
छत्रपती संभाजीनगर : बी. फार्मसी (चार वर्षांचा) आणि फार्म डी (सहा वर्षांचा) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी २०२५-२६ शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेत यावर्षीही तारीख पे तारीखचा खेळ पुन्हा सुरू झाला. तिसऱ्यांदा या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली असून, विद्यार्थ्यांना २८ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्जासाठी मुदत देण्यात आली तर ‘डी फार्मसी’ प्रवेश अर्ज नोंदणीला बुधवारी (ता. २३) सुरवात होत असून, नोंदणीसाठी महिनाभराची मुदत देण्यात आल्याने प्रवेशासाठी सप्टेंबर उजाडणार आहे.