
फुलंब्री : शहरासह तालुक्याची जीवनरेषा मानल्या जाणाऱ्या फुलंब्री मध्यम प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सततच्या पावसामुळे धरण भरल्याने खरीप पिकांबरोबर रब्बी हंगामासाठीही पाण्याची हमी मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.