
Sarpanch Protest
sakal
फुलंब्री : फुलंब्री तालुक्यातील राजनगाव ते पिरबावडा हा शेतवस्तीवरून येणाऱ्या या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून संपूर्ण रस्ता चिखलात हरवला आहे. सदरील रस्ता जिल्हा परिषदेच्या मालकीचा असून मोठ्या पावसामुळे रस्त्यावर पाणी व चिखल साचून खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या रस्त्याची दुरवस्था लक्षात घेऊन गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी पाण्यात बसून शनिवारी (ता.२०) आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.