
गंगापूर शहरातील चित्र : सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढले
गंगापूर : शहरातील तापमानात अचानक मोठी घट झाली असून, तापमान घसरल्याने गारठा प्रचंड वाढला आहे. थंडी वाढल्याने आरोग्याच्या समस्याही वाढल्या असून सर्दी, ताप, खोकल्यासह संसर्गजन्य आजाराचे रुग्ण वाढले आहेत.
हेही वाचा: नांदेड : मुलींच्या शिक्षणाचा होतोय खेळखंडोबा
हाडे गोठविणाऱ्या थंडीमुळे नागरिकांना पुन्हा स्वेटर, टोपी अशा गरम कपड्यांचा वापर करून शरीराचे संरक्षण करावे लागत आहे. तसेच शेकोटीचाही आधार नागरिकांनी घेतला आहे. शहरासह ग्रामीण भागात सोमवारी (ता.२५) दिवसभर ढगाळ वातावरण होते. धुळीच्या वादळामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे रात्रीतून तापमानात ५ अंशांनी घट आली.
पुढील चार दिवस अशीच स्थिती असेल. वाऱ्याचा वाढलेला वेग काहीसा कमी होईल. परंतु किमान तापमान स्थिर राहणार असल्याने थंडीची तीव्रता कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वाढलेल्या थंडीमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. नागरिकांकडून दिवसभर गरम कपड्यांचा आधार घेतला जात आहे. शिवाय ठिकठिकाणी शेकोट्या पेटविण्यात येत असल्याचे दिसत आहे. बदलेल्या वातावरणाचा आरोग्यावरही परिणाम झाला असून सर्दी, खोकला, ताप यासारख्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
Web Title: Picture Of Gangapur City Cold Fever Cough Patients Increased
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..