नांदेड : मुलींच्या शिक्षणाचा होतोय खेळखंडोबा

पालकांपुढे प्रश्न; दररोज शाळेत जाण्यासाठी पैसे आणायचे कुठून
ST Bus education
ST Bus education esakal

नांदेड : मागील दोन महिन्यांपासून एसटीचा संप सुरु असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनींची शिक्षणाची समस्या गंभीर झाली आहे. दररोज रोख पैसे देऊनही जीव मुठीत धरुन विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यामुळे मुलींची कुचंबणा होत आहे. आर्थिक परिस्थिती लक्षात घेता दररोज प्रवासाला लागणारा पैसा आणायचा कोठून? असा पेच ग्रामीण भागातील पालकांसमोर निर्माण झाला आहे.(ST Bus education News)

ST Bus education
प्रजासत्ताक दिन : सॅल्यूट! उणे ३५ अंश सेल्सियस तापमानात फडकवला तिरंगा

एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण करावे, म्हणून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. तब्बल दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी संपावर तोडगा निघालेला नाही. संपाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसत आहे. अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना मोफत पास सवलत देण्यात येते. तर विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात शैक्षणिक पास देण्यात येते.

परंतु, एसटीच्या बेमुदत संपामुळे बससेवा पूर्णपणे बंद आहे. शासनातर्फे इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरु केले आहे.

विद्यार्थ्यांनी शाळा - महाविद्यालयांमध्ये हजेरी लावायलाही सुरुवात केली आहे. परंतु बस बंद असल्याने विद्यार्थ्यांना खासगी प्रवासी वाहतुकीवर अवलंबून राहावे लागत आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फायदा घेत खासगी वाहतूकदारांनी प्रवास भाड्यात दुपटीने वाढ केली आहे. त्यामुळे पालकांना आर्थिक फटका बसत आहे. तसेच वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यामुळे विद्यार्थिनींची कुचंबना होत आहे.

ST Bus education
राज्यात सर्वांना हुडहुडी, मुंबईसह 'या' जिल्ह्यांमध्ये पारा घसरला

खासगी वाहतुक जीवघेणी

गावखेड्यातील मुलींचे शिक्षण हे एसटीवर अवलंबून आहे. परंतु, गेल्या दोन महिन्यांपासून एसटीचा संप सुरु असल्याने गावखेड्यातील मुलींचे शिक्षण थांबले आहे. खासगी वाहतुकदार कोंबड्यागत प्रवाशी कोंबतात. त्यामुळे अनेक पालकांनी मुलींचे शिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

ST Bus education
मंत्री आदित्‍य ठाकरे उद्या नाशिक दौऱ्यावर

बस सुरू करण्याची मागणी

एसटीचा संप सुरुच राहिला तर मुलींच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होणार आहे. मानव विकास मिशनच्या बसेस प्रत्येक आगारात उभ्या आहेत. शासनाने मुलींच्या शिक्षणासाठी या बसेसचा वापर करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com