
छत्रपती संभाजीनगर : शेंद्रा व बिडकीन औद्योगिक वसाहतीमध्ये आलेल्या आणि भविष्यात येऊ घातलेल्या उद्योगांचा सहभाग उत्साहवर्धक असून, त्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्यास सरकार इच्छुक आहे. मात्र, येथील उद्योग लवकरात लवकर कार्यान्वित करून गुंतवणूक व रोजगार निर्मितीस प्राधान्य द्यावे, असे आवाहन केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केले.