

Police Excesses Spark Outrage in Chhatrapati Sambhajinagar, Suspension Ordered
sakal
छत्रपती संभाजीनगर: लाइट फिटिंगचे काम आटोपून घरी परतणाऱ्या तरुणाला त्याच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचे सांगत पोलिसांनीच जबर मारहाण केल्याचा प्रकार बुधवारी (ता. २१) रात्री घडला. अक्षय ज्ञानेश्वर ठोकळ (वय ३२, रा. मुकुंदवाडी) असे मारहाणीत जखमी तरुणाचे नाव आहे. याबाबत मुकुंदवाडी ठाण्यात दोन पोलिसांवर गुन्हा नोंद झाला.