Chatrapati Sambhajinagar News : क्रिप्टोकरन्सीत कोट्यवधींचे बेनामी व्यवहार करणाऱ्या टोळीची कसून चौकशी

शेकडो तरुणांच्या खात्यावरून कोट्यवधींचे बेनामी व्यवहार करणाऱ्या टोळीची गुरुवारी (ता. १२) इंटेलिजन्स ब्युरोच्या (आयबी) पाच अधिकाऱ्यांच्या पथकाने कसून चौकशी केली.
crypto currency
crypto currencyesakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - शेकडो तरुणांच्या खात्यावरून कोट्यवधींचे बेनामी व्यवहार करणाऱ्या टोळीची गुरुवारी (ता. १२) इंटेलिजन्स ब्युरोच्या (आयबी) पाच अधिकाऱ्यांच्या पथकाने कसून चौकशी केली. ही टोळी ज्या भारतीय रुपयांचे क्रिप्टोकरन्सीत रूपांतर करीत होती, ते पैसे यांना नेमके कोठून यायचे, याचा शोध घेण्याच्या कामाला वेग आला आहे. तपासासाठी शहर पोलिसांची पथके परराज्यातही जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com