Chhatrapati Sambhajinagar : कर्णपुरा यात्रेतून चोरलेली दुचाकी विक्रीसाठी आणलेल्या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीच्या चौदा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर : कर्णपुरा यात्रेतून चोरलेली दुचाकी कर्णपुरा मैदानावरच विक्रीसाठी आणलेल्या दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. २४ मार्चला ही कारवाई करण्यात आली. संशयित आरोपींच्या ताब्यातून चोरीच्या चौदा दुचाकी जप्त करण्यात आल्या.