
आडूळ : गेल्या अनेक दिवसांपासून घारेगाव (ता. पैठण) येथील सुखना नदीपात्रात वाळूचा अवैध उपसा सुरू होता. दैनिक ‘सकाळ’ने याबाबत बातमी प्रकाशित केली होती. यानंतर शनिवारी (ता. २३) सकाळी अवैध वाळू उपसा करीत असलेले पाच ट्रॅक्टर जप्त करून ट्रॅक्टरचालकांना ताब्यात घेतले.