Lok Sabha Poll : छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाला शांततेत सुरुवात; पहिल्या दोन तासात झाले ७.५२ टक्के मतदान

पहिल्या दोन तासात जिल्ह्यात ७.५२ टक्के मतदान झाले. पहिल्या दोन तासात सकाळी ९ पर्यंत औरंगाबाद मध्य मतदारसंघात ८.५ टक्के मतदान झाले .
polling begins peacefully in chhatrapati sambhajinagar 7 52 percent voting took place in the first two hours
polling begins peacefully in chhatrapati sambhajinagar 7 52 percent voting took place in the first two hoursSakal

छत्रपती संभाजीनगर : लोकसभेच्या औरंगाबाद मतदार संघात सकाळी सात वाजता सर्वच २०४० मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात आपले मतदान उरकून घ्यावे या हेतूने मतदानाला सुरुवात होण्यापूर्वीपासूनच दहा - मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून पीएमएस ( पोलींग माॅनिटरींग सिस्टीम ) - २४ अॅपद्वारे व वेबकास्टींगद्वारे मतदानावर लक्ष ठेवून आहेत.

पहिल्या दोन तासात जिल्ह्यात ७.५२ टक्के मतदान झाले. पहिल्या दोन तासात सकाळी ९ पर्यंत औरंगाबाद मध्य मतदारसंघात ८.५ टक्के मतदान झाले . पश्चिम मध्ये ८.२६, पूर्व मध्ये ९.७२, गंगापूर ५.६८, वैजापूर ६.३३ आणि कन्नड विधानसभा मतदारसंघांमध्ये ६.४ टक्के मतदान झाले.

दिवसा उन्हाचा चटका जाणवेल , लवकर मतदान करुन घ्यावे यासाठी सकाळीच मतदार घराबाहेर पडलेले दिसले. नागसेन वन परिसर, बेगमपूरा , शहराचा मध्यवर्तीी भाग नागेश्वरवाडीत मतदानाला सुरुवात होण्यापूर्वीच दहा मिनीटे आधी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदारांचा उत्साह होता.

मतदारांना आपले मतदान लवकर करुन घेण्याची उत्सूकता होती. महाविकास आघाडीच्या बुथवर सकाळपासून कार्यकर्त्यांची गर्दी होती, कार्यकर्त्यांची धावपळ सुरु होती. मदत करण्यासाठी. तर शिंदे गटाचे कार्यकर्ते पोचलेले नव्हते.

त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बुथवर बसले होते, त्यांनीही पुरुषांनी शर्टाला तर महिलांनी साडीला कमळा बॅच लावला होता तर खांद्यावर कमळाचे उपरणे होते. मुस्लिम बहुल भागात एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये सकाळपासूनच उत्साह होता.

या भागामध्ये महाविकास आघाडीतील घटकपक्ष काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅग्रेसचेही कार्यकर्ते दिसत होते. एमआयएमच्या कार्यकर्ते लॅपटाॅप, मोबाईलचा वापर करण्यात आघाडीवर दिसत होते. त्या तुलनेत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बेगमपूरा, नागसेनवन परिसर वगळता सकाळच्या पहिल्या सत्रात फारसे दिसले नाहीत.

जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला रांगेत थांबून मतदानाचा हक्क

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सुभेदारी विश्रामगृहाजवळील शासकीय ज्ञान- विज्ञान महाविद्यालयातील मतदान केंद्रात सकाळी पहिल्या टप्प्यातच मतदारांच्या रांगेत थांबून सपत्नीक मतदानाचा अधिकार बजावला. यानंतर बोलताना त्यांनी सांगितले, जिल्ह्यात सर्वत्र सकाळी सात वाजता शांततेत मतदानाला सुरुवात झालेली आहे. मी माझा मतदानाचा हक्क बजावला आहे, तुम्ही सर्व मतदारांनीदेखील आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट व समृद्ध करावी असे आवाहन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com