Aurangabad| पैठणमध्ये ताराच्या घर्षणामुळे डाळिंबाची बाग जळून खाक

खुप मेहनत घेऊन बाग जोपासली होती. त्यावर मोठा खर्च ही केला. मात्र...
Pomegranate Garden Burned
Pomegranate Garden Burnedesakal

आडूळ (जि.औरंगाबाद ) : महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे डाळिंब बागेतून गेलेल्या विद्युत खांबावरील तारांचे घर्षण होऊन देवगाव (ता.पैठण) येथील एका शेतकऱ्याची लाखो रुपयांचे उत्पन्न देणारी डाळिंब (Pomergrante) बाग जळुन खाक झाल्याची घटना शुक्रवारी (ता.२९) दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. यामुळे सदरील शेतकरी (Farmer) पूर्णतः रस्त्यावर आला असून त्याच्या डोळ्या देखत त्याचे उपजीविकेचे साधन जळत असतांना त्याला व त्याच्या कुटुंबियांना आश्रु अनावर झाले होते. पांडुरंग अविनाश जोशी यांची देवगाव शिवारात गट क्रमांक १३४ मध्ये शेती असुन यात ३०० झाडांची फळाला लागलेली डाळिंब बाग आहे. (Pomegranate Garden Burned Due To Short Circuit In Paithan Of Aurangabad)

Pomegranate Garden Burned
इफ्तार पार्टीला या ! इम्तियाज जलील यांचे राज ठाकरेंना आमंत्रण

याच शेतातून महावितरण कंपनीचे खांब गेलेले असुन शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास या खांबावरील विद्युत तारांत घर्षण होऊन सर्वच्या सर्व ३०० डाळिंब झाडे जळून खाक झाली. डाळिंब बाग जोपासण्यासाठी शेतकरी जोशी व त्यांच्या कुटुंबियांनी खूप मेहनत केली होती. उन्हा-तान्हात कष्ट तर केलेच शिवाय झाडा़ना फळधारणा व्हावी म्हणून रासायनिक खते व औषधासाठी उसनवारी करुन मोठा खर्च केला होता. त्यामुळे त्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. देवगावसह परिसरातील महावितरण कंपनीच्या विद्युत खांबावरील तार खूप जीर्ण झाल्या असून ते केव्हाही तुटतात. एकत्र जमा होतात. त्यामुळे ताराखाली असलेला शेतकऱ्यांचा माल जळून जातो. तसेच विद्युत पुरवठा खंडित होतो. आग लवकर आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टाळले.

Pomegranate Garden Burned
Aurangabad| सुनेने केला सासूचा खून, जळालेले लाकूड मारले डोक्यात मारले

खुप मेहनत घेऊन बाग जोपासली होती. त्यावर मोठा खर्च ही केला. मात्र महावितरणच्या हलगर्जीपणा मुळे माझी बाग जळाल्याने माझ्या सुखी संसाराची राख रांगोळी झाली आहे.

- पांडुरंग जोशी, शेतकरी, देवगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com