Fulambri News : गिरिजा नगरमधील ड्रेनेज खचल्याने आरोग्य धोक्यात, नागरिक संतप्त

Drainage Issue : फुलंब्रीतील गिरिजानगर भागात खचलेल्या निकृष्ट ड्रेनेजमुळे सांडपाणी रस्त्यांवर साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
Drainage Issue
Drainage IssueSakal
Updated on

फुलंब्री : शहरातील गिरिजानगर परिसरात वर्षभरापूर्वी केलेली निकृष्ट दर्जाची ड्रेनेज खचल्याने दुर्गंधीयुक्त पाण्याने या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नगरपंचायत अभियंता व गुत्तेदाराचे पितळ उघडे पडले आहे. नव्याने केलेले ड्रेणेज वर्षभरातच खचल्याने निकृष्ट दर्जाचे काम उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या ड्रेनेजचे आउटलेट कुठेच जोडणी केलेली नसून बिले काढण्यासाठी अभियंता व गुत्तेदार यांनी संगनमत करून हा प्रताप केल्याची चर्चा सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com