
छत्रपती संभाजीनगर : हिंदू धर्मात गंगाजलाला मोठे महत्त्व आहे. पण, अनेकांना इच्छा असूनही गंगेतून जल आणता येत नाही. ही अडचण लक्षात घेता टपाल विभागाने गंगाजल उपलब्ध करून दिले आहे. मागील पाच वर्षांत शहरातील ४४४ जणांनी टपाल कार्यालयातून या गंगाजलाची खरेदी केली.