Jayshree Danve Arrest
esakal
प्रमोद पाडसवान खूनप्रकरणातील फरारी आरोपी जयश्री दानवे हिला अखेर पोलिसांनी अटक केली.
जागेच्या वादातून २२ ऑगस्टला झालेल्या हल्ल्यात पाडसवान यांचा खून झाला होता.
न्यायालयाने आरोपी जयश्रीला ३० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
छत्रपती संभाजीनगर : जागेच्या वादातून झालेल्या प्रमोद पाडसवान खून (Pramod Padswan Killing) प्रकरणातील फरारी आरोपी जयश्री दानवे हिला अखेर गुन्हे शाखा पोलिसांनी बेड्या (Police Custody) ठोकल्या. सिडकोतील संभाजी कॉलनीत २२ ऑगस्टला पाडसवान आणि निमोने या दोन कुटुंबीयांत जागेवरून वाद झाला होता. दरम्यान, प्रमोद पाडसवान यांचा खून झाला होता. याप्रकरणातील आरोपी जयश्री दानवे ही तेव्हापासून फरारी होती. तिला पोलिसांनी २७ सप्टेंबरला अहिल्यानगर येथून अटक केली.