((((मराठवाडा आवृत्तीसाठी SIILC च्या लोगोसह वापरावी)))))
---
प्रीमियम फळपिकांच्या लागवडीचे
तंत्र शिकविणारी कार्यशाळा
---
छत्रपती संभाजीनगर येथे २७ सप्टेंबरला मार्गदर्शन
---
छत्रपती संभाजीनगर, ता. २१ : ड्रॅगनफ्रूट, अॅव्होकॅडो, स्ट्रॉबेरी आणि बेरीज यासारख्या प्रीमियम फळपिकांना बाजारपेठेत वाढती मागणी असून, या पिकांमधून शेतीला अधिक उत्पन्नाचे पर्याय उपलब्ध होऊ शकतात. या फळपिकांची शास्त्रीय पद्धतीने लागवड, गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि बाजारपेठेचे नियोजन याबाबत मार्गदर्शन करणारी विशेष ‘प्रीमियम पिकांची ओळख व लागवड प्रशिक्षण’ कार्यशाळा रविवार, २७ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.
या कार्यशाळेत आपल्या शेतासाठी योग्य पीक निवडण्यापासून सुरवात करून जमीन आणि हवामानाची निवड, विविध जातींची निवड, लागवडीचे तंत्र, सिंचन व खत व्यवस्थापन, छाटणी, रोग-कीड नियंत्रण आणि उत्पादन वाढविण्याच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. शिवाय काढणी, ग्रेडिंग, साठवणूक आणि काढणीनंतरची हाताळणी याविषयीही माहिती दिली जाणार आहे.
याशिवाय या पिकांचे उत्पादन खर्च, उत्पन्नाचे गणित, विक्रीसाठी उपलब्ध बाजारपेठा, मूल्यवर्धन आणि प्रभावी विक्री धोरण यावरही मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे नवीन फळपिकांची लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना पीक निवडीपासून विक्रीपर्यंतचे नियोजन समजून घेता येणार आहे.
शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसोबत प्रीमियम फळपिकांच्या संधींचाही अभ्यास करून योग्य नियोजन करावे, या उद्देशाने आयोजित ही कार्यशाळा कृषी क्षेत्रात नवीन प्रयोग करू इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
----
प्रशिक्षणामध्ये काय शिकाल ?
-जमीन, हवामान व वाण निवड
-सिंचन व खत व्यवस्थापन
-रोग व कीड नियंत्रण
-काढणी, ग्रेडिंग व साठवण
-विक्री व मूल्यवर्धन
-खर्च-नफा नियोजन
----------------------------------------------------
अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क ः ८४८४८११५४४.
कार्यशाळेचे ठिकाण : ‘सकाळ’ कार्यालय, प्लॉट नं. ७, एन-१, सिडको टाऊन सेंटर, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर
---------------------------------------------------------