production of cotton 35 Gunta
production of cotton 35 Gunta sakal

३५ गुंठ्यात कपाशीचे विक्रमी उत्पादन

मुरादाबाद येथील कोरडवाहू शेतकऱ्याच्या उत्कृष्ट नियोजनामुळे साधली किमया

आडुळ : एकीकडे वातावरणाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान होऊन मशागत खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. मात्र, अवघ्या ३५ गुंठ्यात कपाशीचे विक्रमी उत्पादन घेण्याची किमया मुरादाबाद येथील शेतकऱ्यांनी साधली आहे. विजयसिंग सांडुसिंग गुसिंगे (रा.मुरादाबाद ता.पैठण) येथील शेतकऱ्याने अवघ्या ३५ गुंठ्यात कपाशीचे पीक घेतले होते. पाणी योग्य निगा राखून कपाशीचे पीक जगविण्यासाठी मेहनत घेतली. यामुळे आतापर्यंत त्यांनी १७ क्विंटल कापूस वेचून घरी आणला असून आणखी १३ क्विंटल कापूस निघेल,असा त्यांचा अंदाज आहे. यंदा कापसाला ८ ते १० हजाराचा भाव मिळत असल्याने त्यांना ३५ गुंठ्यात अडीच ते तीन लाखाचे उत्पन्न होणार आहे.

production of cotton 35 Gunta
लसीकरणाने मिळाला अर्थव्यवस्थेला बूस्टर

अशी राखली निघा

विजयसिंग गुसिंगे यांची ६ एकर कोरडवाहू शेती असून त्यांनी यंदा ५ एकर क्षेत्रात तूर व सोयाबीनची लागवड केली होती तर ३५ गुंठ्यात ३.५ × ७ फुटावर १७ जूनला कपाशीची लागवड केली होती. कपाशीला वेळेवर सहा औषधी फवारणी व दर १० ते १२ दिवसाला १०-२६-२६ या रासायनिक खताची एक बॅग प्रमाणे सहा बॅग खत टाकले. शिवाय सहा पाळ्या वखराच्या मारुन मशागत केली. तर फक्त एक वेळ मोकळे पाणी दिले.

लागवडी पासूनच कपाशीच्या पिकाची सर्व प्रकारची काळजी घेतली. फवारणी व रासायनिक खते वेळेवर दिली. त्यामुळे सध्या १७ क्विंटल कापूस झाला. कपाशीच्या एका झाडाला शंभरच्यावर कैऱ्या असल्याने आणखी १३ क्विंटल कापूस होईल.

- विजयसिंग गुसिंगे, शेतकरी, मुरादाबाद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com