Dr. Dasu Vaidya: शिक्षक साहित्य संमेलनाध्यक्षपदी दासू वैद्य; अकोला शहरात डिसेंबरमध्ये आयोजन
Maharashtra Literature : प्रख्यात कवी व गीतकार प्रा. डॉ. दासू वैद्य यांची ११ व्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड झाली आहे. हे संमेलन यंदा अकोल्यात १४ डिसेंबर रोजी होणार असून, साहित्य व अध्यापनाची दिशा ठरवणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : राज्यव्यापी ११ व्या शिक्षक साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख तथा ख्यातनाम कवी, गीतकार प्रा.डॉ. दासू वैद्य यांची निवड करण्यात आली आहे.