राजन शिंदेंचा खून अल्पवयीन मुलानेच केला, आठ दिवस चालला तपास

औरंगाबादेतील बहुचर्चित प्रा. डॉ. राजन शिंदे यांच्या खूनाचा अखेर आठ दिवसांनी उलगडा झाला आहे. एका अल्पवयीन मुलाने हा खून केल्याचे समोर आले आहे.
प्रा. राजन शिंदे खून प्रकरण
प्रा. राजन शिंदे खून प्रकरणsakal

औरंगाबाद : सिडकोतील एन-२, संत तुकोबानगरात राहणाऱ्या बहुचर्चित प्रा. डॉ. राजन शिंदे यांच्या खूनाचा अखेर आठ दिवसांनी उलगडा झाला आहे. एका अल्पवयीन मुलाने (विधीसंघर्ष बालक) हा खून केल्याचे समोर आले आहे. त्याला ताब्यात घेतले असून, बालन्याय मंडळ (बाल निरीक्षणगृह) यांच्याकडे सोपविण्यात आले (Rajan Shinde Murder Case) असल्याचीही माहिती शहर पोलिस दलातील परिमंडळ दोनचे उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी सोमवारी (ता.१८) सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली. प्रा. शिंदे हे शहरातील (Aurangabad) मौलाना आझाद महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक होते. ११ ऑक्टोबर रोजी पहाटे प्रा. शिंदे यांचा खून झाल्याचे समोर आले होते. खुनाच्या १५ दिवस आधीपासून प्रा. शिंदे आणि विधीसंघर्ष बालक यांच्यात या ना त्या किरकोळ कारणावरून वाद होत होता. त्यातून विधीसंघर्ष बालकाने काटा काढायचे ठरविले होते. त्यासाठी त्याने पहाटेची वेळ (Crime In Aurangabad) निवडली होती. रात्री उशिरापर्यंत प्रा. शिंदे हे पत्नीसह टीव्ही पाहत बसले. मात्र विधीसंघर्ष बालकाच्या मनात वेगळीच डाळ शिजत असल्याची कल्पनाही प्रा. शिंदे यांना नव्हती. तब्बल ८ दिवसानंतर खूनाचा उलगडा झाला असून, सदर तपास हा गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. तपासासाठी एसआयटीही (विशेष शोध पथक) स्थापन करण्यात आली होती. यामध्ये गुन्हे शाखेसह सायबरचे अधिकारी, इतर ठाण्याच्या महिला अधिकाऱ्यांचा समावेश होता.

प्रा. राजन शिंदे खून प्रकरण
फक्त २७ हजारांमध्ये घरी आणा Bajaj Discover125,न आवडल्यास करा परत

चाकू, डंबेल्सने घेतला जीव
विधीसंघर्षग्रस्ताने प्रा. शिंदेंच्या डोक्यावर साधारण साडेचार- पाच किलोच्या डंबेल्सने वार केला. यामध्ये प्रा. शिंदे हे बेशुद्ध पडले. त्यानंतर विधीसंघर्षग्रस्ताने भाज्या चिरायच्या वितभर चाकूने प्रा. शिंदेंच्या गळ्यावर वार केले. विशेष म्हणजे एकापाठोपाठ हे वार केले गेले होते. त्यानंतरही हालचाल जाणविल्याने विधीसंघर्ष बालकाने शिंदेंच्या हाताच्या नसाही अगदी खोलवर कापल्या होत्या. त्यानंतर चाकू, डंबेल्स आणि रक्ताने माखलेला टॉवेल हे घरालगतच्या विहिरीत टाकले होते.

....म्हणून प्रा. शिंदे यांचा झाला खून
प्रा. राजन शिंदे आणि विधीसंघर्षग्रस्त या दोघांचा स्वभाव एकमेकांना पटणारा नव्हता. विधीसंघर्ष बालकाला एका क्षेत्रात करिअर करायचे होते. तर प्रा. शिंदे यांच्या मते दुसऱ्या क्षेत्रात करिअर करावे, अशी मीमांसा पोलिसांनी पत्रकार परिषदे दरम्यान केली. खुनाच्या १५ दिवसांपूर्वीपासून शिंदे आणि विधीसंघर्ष बालकात साध्या विषयावरून उडणारे खटके यात वाढ झाली होती. विधीसंघर्ष बालकाच्या करिअरसंदर्भात बालक व प्रा. शिंदे यांच्यात तीव्र मतभेद होते. यातून दोघांतील कलह वाढलेला होता. सोबतच अंतर्गत कलहाचीही जोड मिळाल्याने ‘त्या’ पहाटे शिंदेंचा निर्घृण खून केल्याची कबुली विधीसंघर्ष बालकाने पोलिसांना दिल्याची माहिती उपायुक्त गिऱ्हे यांनी यावेळी दिली.

तीन दिवस सुरु होता विहिरीचा उपसा
विधीसंघर्ष बालक हा तपासाच्या पहिल्या दिवसापासूनच पोलिसांना ‘पूर्वनियोजित’ उत्तरे देत होता. त्यामुळे पोलिसांनाही पुराव्याशिवाय काही करता येत नव्हते. पोलिसांना त्याने खून केल्याची कबुली दिली खरी, मात्र खुनात वापरलेली हत्यारे कुठे टाकली? याबद्दल तो वाच्यता करत नव्हता. अखेर घरा शेजारील विहिरीत हत्यारे टाकल्याचे पोलिसांना तीन दिवसांपूर्वी त्याने सांगितले. सदर विहीर ही महापालिकेची बंद विहीर होती. तसेच आजूबाजूला सीसीटीव्ही नसल्याने विधीसंघर्ष बालकाने सदर विहिरीत हत्यारे टाकल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी म्हणजेच शुक्रवारपासून (ता.१५) सदर विहिरीतील गाळ उपसणे सुरु केले होते. अथक परिश्रम, अडचणीवर मात करत पोलिसांनी विहिरीतून डंबेल्स, चाकू, आणि रक्त पुसून घेतलेला टॉवेल पोलिसांनी हस्तगत करून पंचनामा केला.

प्रा. राजन शिंदे खून प्रकरण
चीनच्या कुरापतीनंतर भारताने 'अरुणाचल' मधील सुरक्षा वाढवली

‘त्या’च्या सोबतच पोलिसांना जेवणही करावे लागले
ताब्यात घेण्यात आलेला विधीसंघर्ष बालक हा राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या पहिल्या वर्षात शिकत होता. तो पोलिसांना समाधानकारक उत्तरे देत नसल्याने पोलिसांची हतबलता वाढली होती, असे असले तरी तो बोलेल त्यासाठी पोलिसांच्या विविध क्लृप्त्या सुरु होत्या. मात्र ‘तो’ दाद देत नव्हता. पोलिसांनी हे प्रकरण संयमाने घेत ‘त्याच्याशी’ सलगी वाढविली, त्याला विश्वासात घेतले, हळूहळू प्रश्नांचे जाळे फेकत त्यांनी विधीसंघर्ष बालकाकडून पुराव्याबद्दल माहिती मिळविली. त्यासाठी वेळप्रसंगी विधीसंघर्ष बालकासोबत जवळीक साधण्यासाठी पोलिसांना त्याच्यासोबत जेवणही करावे लागल्याचे सूत्रांनी सांगितले.

सर्व बाजूंनी केला तपास
पोलिसांनी तपासाची दिशा स्पष्ट करत सर्व बाजूंनी तपासाची दिशा ने तपास केला. पाच ते सहा दिवस, विविधस्तरावर, शैक्षणिक, सामाजिक स्तरातून पोलिस दलावर दबाव येत होता. हा तपास मुदतीत, कोणतीही त्रुटी न राहता करायचा होता.

पुरावे मिळाले, खात्री झाली, मगच घेतले ताब्यात
विधीसंघर्ष बालकाला विश्वासात घेऊन त्याच्याविरोधातील पुरावे हस्तगत करण्यात आले. त्यानंतरच त्याला ताब्यात घेण्यात आल्याचे डीसीपी गिऱ्हे म्हणाले. आठ दिवस विविध पथकांनी तपास केल्यानंतर सायंकाळी तपासासंदर्भातील माहिती एकत्रित केली जात होती. यामध्ये गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्यासह अधिकाऱ्यांचा समावेश होता.

क्राईम वेबसिरीज बघून ठरविले
प्रा. राजन शिंदेंवर विधीसंघर्ष बालकाचा अनेक दिवसांपासूनचा राग होता. तो धुमसत असतानाच त्याने ह्यूमन किलींगसंदर्भातील अनेक वेबसिरीज पाहिल्या असल्याची माहिती पोलिस तपासा दरम्यान समोर आल्याचे गिऱ्हे यांनी सांगितले. ही कारवाई पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त दीपक गिऱ्हे, सिडकोचे निशिकांत भुजबळ, श्री. आघाव, निरीक्षक ब्रम्‍हा गिरी, सायबरचे निरीक्षक गौतम पातारे, उस्मानपुऱ्याच्या निरीक्षक गीता बागवडे, एपीआय अजबसिंग जारवाल, मनोज शिंदे, दत्ता शेळके, उपनिरीक्षक अनिता फासाटे, उपनिरीक्षक वैशाली गुळवे यांच्यासह पथकातील टीमने केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com