फक्त २७ हजारांमध्ये घरी आणा Bajaj Discover125,न आवडल्यास करा परत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bajaj Discover
फक्त २७ हजारांमध्ये घरी आणा Bajaj Discover125,न आवडल्यास करा परत

फक्त २७ हजारांमध्ये घरी आणा Bajaj Discover125,न आवडल्यास करा परत

तुम्हाला बजाज डिस्कव्हर १२५ (Bajaj Discover 125) या बाईकविषयी सांगणार आहोत. तिची किंमत ५१ हजार ७९३ रुपयांपासून सुरु होते. जी टाॅप माॅडलमध्ये ६२ हजार २५३ रुपयांपर्यंत जाते. ही बाईक तिच्या मायलेज आणि किंमतीसाठी सर्वाधिक पसंत केली जाते. तुम्हाला ही बाईक आवडत असेल. मात्र खरेदी करण्यासाठी ५० हजारांचे बजेट नाही. तर आम्ही येथे ही बाईक केवळ २७ हजार रुपयांत खरेदी करण्याच्या ऑफरविषयी सांगणार आहोत. ऑफरपूर्वी डिस्कव्हर १२५ चे फिचर्स जाणून घेऊ या...

- बजाज डिस्कव्हर १२५ मध्ये कंपनीने १२४.५ सीसीचे इंजिन दिले आहे. जे ११ पीएसचे पाॅवर आणि ११ एनएमचे पीक टाॅर्क जनरेट करते. या इंजिनसह ४ स्पीड मॅन्युअल गिअरबाॅक्स देण्यात आले आहे.

- बाईकच्या ब्रेकिंग सिस्टममध्ये कंपनीने तिच्या फ्रंट व्हिलमध्ये डिस्क ब्रेक आणि रिअर व्हिलमध्ये ड्रम ब्रेकचे काॅम्बिनेशन दिले आहे. त्याबरोबर ट्युबलेस टायर देण्यात आले आहे.

- मायलेजबाबत कंपनीच्या दाव्यानुसार ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये ८२.४ किलोमीटर धावते.

हेही वाचा: होंडा अॅक्टिव्हा खरेदी करा २५ हजारात, आवडली नाही तर परत करा

ऑफरविषयी जाणून घेऊ या

- वास्तविक ही ऑफर दिली आहे जुन्या वाहनांचा व्यवहार करणारे संकेतस्थळ CARS24ने. या संकेतस्थळाने आपल्या टु-व्हिलर सेक्शनमध्ये डिस्कव्हरला लिस्ट केले आहे. तिची किंमत २७ हजार रुपये ठेवण्यात आली आहे.

- संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार या बाईकचे माॅडेल २०१३ चे असून तिची ऑनरशीप फर्स्ट आहे. बाईक आतापर्यंत १३ हजार ८९९ किलोमीटरपर्यंत धावली आहे. तिची नोंदणी दिल्लीतील आरटीओत करण्यात आली आहे.

- बाईक खरेदी केल्यावर कंपनी काही अटींसह एका वर्षाची वाॅरंटी देत आहे. त्याबरोबरच कंपनी सात दिवसांचे मनी बॅक गॅरंटीही देऊ करित आहे.

- या मनी बॅक गॅरंटीनुसार, खरेदी केल्यावर सात दिवसांत बाईक आवडली नाहीतर ती कंपनीला परत करता येऊ शकते. त्यानंतर कंपनी तुमचे पैसे परत करेल. त्यात कोणतीही काटछाट केली जात नाही.

Web Title: Second Hand Bajaj Discover 125 In 27 Thousand

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..