Professor Recruitment : प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा; भरतीच्या जाहिरात मंजुरीसाठी आज व्यवस्थापन परिषदेची बैठक
Education Sector : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक भरतीवरील स्थगिती उठवण्यात आली आहे. भरती प्रक्रियेसाठी जाहिरात मंजुरीबाबत आज व्यवस्थापन परिषदेची बैठक होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक भरतीवरील स्थगिती उठवण्यात आली. त्यासंदर्भातील पत्र शनिवारी (ता. १५) सकाळी विद्यापीठाला प्राप्त झाले.