प्राध्यापकांचा प्रवास भत्ता वाढीच्या अंमलबजावणीसाठी आक्रमक पवित्रा

प्राध्यापकांचा प्रवास भत्ता वाढीच्या 
अंमलबजावणीसाठी आक्रमक पवित्रा
Published on
प्राध्यापकांच्या प्रवास भत्ता वाढीची अंमलबजावणी करा ः बामुक्टा --- छत्रपती संभाजीनगर, ता. २ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेने मंजूर केलेल्या स्थानिक प्रवास भत्ता आणि वाहन भत्त्याच्या वाढीची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने प्राध्यापक संघटनांनी नाराजी व्यक्त केली. सदर निर्णय तातडीने लागू करून १ एप्रिल २०२६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने सुधारित दराने भत्ता द्यावा, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, कॉलेज टिचर्स असोसिएशनतर्फे (बामुक्टा) करण्यात आली. निवेदनाचा आशय असा ः १५ मार्च २०२५ रोजी झालेल्या अधिसभेत स्थानिक प्रवास भत्ता १५० रुपयांवरून ५०० रुपये करण्याचा, तसेच डिझेल वाहनासाठी प्रतिकिलोमीटर १२ रुपये आणि पेट्रोल वाहनासाठी १३ रुपये भत्ता देण्याचा ठराव सर्वसंमतीने मंजूर झाला होता. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या अधिसभेतही या विषयावर पुनश्च चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली. मात्र, अद्याप निर्णयाची अंमलबजावणी झालेली नसल्याचे प्राध्यापकांनी म्हटले आहे. २००६ नंतर स्थानिक प्रवास भत्त्यात वाढ झालेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी ठोस भूमिका घेऊन सुधारित दरांचा आदेश तातडीने काढावा, तसेच पात्र प्राध्यापकांना फरकाची संपूर्ण रक्कम अदा करावी, अशी मागणी केली. निवेदनावर डॉ. राजेश करपे, डॉ. भारत खंदारे, डॉ. अंकुश कदम, प्रा. हरिदास सोमवंशी आणि डॉ. विश्वनाथ कोक्कर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com