NND26B02844 नांदेड ः रेशीम दिनानिमित्त सायाळ येथे प्रगतिशील रेशीम उत्पादकांचा सत्कार करण्यात आला.
---
रेशीम शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळवा ः वडवळे
नांदेड : पारंपरिक शेतीतील अनिश्चिततेवर मात करून शाश्वत व अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा रेशीम अधिकारी अशोक वडवळे यांनी केले. रेशीम दिनानिमित्त जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीने सायाळ (ता.लोहा) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रगतिशील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भारतीय स्टेट बँकेच्या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने दहा दिवसीय मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन झाले. वडवळे म्हणाले की, लोहा तालुक्यातील अनेक प्रगतिशील शेतकरी रेशीम शेतीतून एकरी दोन ते तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न घेत आहेत. त्यांच्या अनुभवातून प्रेरणा घेऊन इतर शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे. कमी पावसामुळे पारंपरिक पिकांवर परिणाम होत असल्याने रेशीम शेती हा फायदेशीर पर्याय ठरू शकतो. कार्यक्रमास एसबीआय-आरसेटीचे संचालक कैलास जायभाये, आशिष राऊत, कांचन जाधव, अभय कुलकर्णी, प्रगतिशील शेतकरी रत्नाकर ढगे आदी उपस्थित होते. माधव जायभाये, भारत राऊत, लक्ष्मण दळवे, किरण शिखरे, गंगाधर पावडे, कल्याण पाटील यांचा सत्कार करण्यात आला.