esakal | अतिवृष्टीग्रस्तांना या निकषावर मिळणार मदत, उद्यापर्यंत नुकसानीचा मिळणार अहवाल
sakal

बोलून बातमी शोधा

3farmer_199

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदत वाटपाची ग्वाही दिली होती.

अतिवृष्टीग्रस्तांना या निकषावर मिळणार मदत, उद्यापर्यंत नुकसानीचा मिळणार अहवाल

sakal_logo
By
ई सकाळ टीम

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदत वाटपाची ग्वाही दिली होती. त्यानुसार अतिवृष्टीमुळे कोकण, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, पुणे, सातारा व कोल्हापूर या भागात झालेल्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून दहा हजार कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा शुक्रवारी (ता.२३) श्री.ठाकरे यांनी केली.

सरकारने जाहीर केलेल्या या मदतीचे वाटप १३ मे २०१५ च्या शासकीय आदेशानुसार (जीआर) केले जाणार आहे. मंगळवारपर्यंत नुकसानीचा अहवाल दिले जाणार आहेत. त्यानंतर मदतीचे वाटप करण्याचे नियोजन आहे. अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील पंचनामे अंतिम टप्प्यात आले आहे. त्याचा अहवाल शासनाला पाठविला जाणार आहे. नुकसानग्रस्तांना शासन निर्णयानुसार मदत दिली जाणार आहे.

महिला, बालकांवरील गुन्ह्यात वाढ! महिलांवरील ३० टक्के गुन्हे पती, नातेवाईकांशी संबंधित


२०१५ मधील निर्णयानुसार मिळणार भरपाई अशी
दुधाळ जनावरे : ३०,०००
मेंढी, बकरी, डुकर ३,०००
उंट, घोडा, बैल : २५,०००
वासरू, गाढव, शिंगरू, खोचर : १६,०००
कुक्कुटपालन : प्रतिकोंबडी ५० रुपये

सखल भागातील पक्के घर पूर्णतः पडझड : ९५,१००
दुर्गम भागातील घर पडझड : १,०१,९००
व्यक्ती मृत : प्रत्येकी चार लाख वारसांना
पक्की घरे १५ टक्के पडझड : ५,२००
कच्चे घर १५ टक्के पडझड: ३,२००
पडझड तथा नष्ट झोपड्या : ४,१००
घराला जोडून असलेला गोठा : २,१००

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी अतिवृष्टीग्रस्तांना १० हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. त्यानुसार जिरायत आणि बागायत क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी १० हजार रूपये, फळबागांसाठी हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत केली जाणार आहे.

दहा हजार कोटींचे असे आहे नियोजन -
रस्ते- पूल - २६३५ कोटी
नगर विकास - ३०० कोटी
महावितरण ऊर्जा - २३९ कोटी
जलसंपदा - १०२ कोटी
ग्रामीण रस्ते व पाणीपुरवठा - १००० कोटी
कृषी-शेती-घरासाठी - ५५०० कोटी

loading image