Nylon Manja : नायलॉन मांजाने पीएसआयचा चिरला गळा; छत्रपती संभाजीनगरातील घटना, पडले तब्बल ३० टाके
PSI Injured : छत्रपती संभाजीनगरमध्ये दुचाकीवरून जात असताना नायलॉन मांजामुळे पोलिस उपनिरीक्षक दीपक पारधेंचा गळा चिरला. त्यांना गंभीर जखम झाल्याने ३० टाके पडले, रिक्षा चालकाने त्यांना रुग्णालयात दाखल केले.
छत्रपती संभाजीनगर : दुचाकीवरून जात असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाचा (पीएसआय) नायलॉन मांजामुळे गळा चिरला. यात ते गंभीर जखमी झाले. रिक्षा चालकाने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असून, त्यांना ३० टाके पडले.