‘पी.यू. जैन’तर्फे आंतरशालेय
प्रश्नमंजूषा ९, १० ऑक्टोबरला
----
छत्रपती संभाजीनगर, ता. ४ : पी.यू. जैन यांच्या ८४ व्या जयंतीनिमित्त राजाबाजार येथे जैन शिक्षण संस्थेच्या पी.यू. जैन माध्यमिक विद्यालयाने आंतरशालेय रौप्य महोत्सवी प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेचे हे २५ वे वर्ष असून, शहर व ग्रामीण विभागासाठी स्वतंत्र नियोजन केले आहे. मनपा क्षेत्रातील शाळांसाठी ९ ऑक्टोबर तर ग्रामीण भागातील शाळांसाठी १० ऑक्टोबरला सकाळी साडेआठ ते साडेनऊ या वेळेत बहुपर्यायी चाळणी परीक्षा होईल.
इयत्ता आठवी ते दहावीतील दोन विद्यार्थ्यांचा एक संघ या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. चाळणी परीक्षेत मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि सामान्यज्ञान या विषयांवरील प्रत्येकी दहा असे एकूण ६० प्रश्न विचारले जातील. यातून अंतिम १५ शाळांची निवड होईल. त्यानंतर पाच-पाच संघांच्या तीन गटांतून एकूण पाच संघ अंतिम फेरीसाठी निवडले जातील. अंतिम स्पर्धा ११ ऑक्टोबरला होणार असून, शहर विभागाची वेळ सकाळी ९.३० ते १२.३० तर ग्रामीण विभागाची दुपारी १ ते ३ अशी आहे. प्रश्नमंजुषेत वस्तुनिष्ठ, झटपट, बझर, दृक्-श्राव्य आणि संवाद अशा विविध फेऱ्यांचा समावेश आहे. स्पर्धेतील सहभागाच्या माहितीसाठी विजय पाटोदी ८२७५२३८७७० यांच्याशी संपर्क साधावा.
----
विजेत्या संघाला ४१०१ रुपयांचे पारितोषिक
विजेत्या संघाला ४१०१ रुपयांचे प्रथम पारितोषिक व फिरती ढाल तर द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ३१०१ व २१०१ रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मानित केले जाणार आहे.