

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: गॅस टंचाईचा फटका आता मेस आणि खाणावळींना बसत आहे. नियमित गॅस सिलिंडर मिळत नसल्याने अनेक मेस चालकांनी पर्याय म्हणून चुली पेटवून स्वयंपाक सुरू केला आहे. काही ठिकाणी मेन्यूमध्ये बदल करण्यात आला असून, मेसवरील डब्ब्यात मिळेल त्यावर विद्यार्थ्यांना समाधान मानावे लागत आहे. परीक्षेचा काळ त्यात मेसची चिंता विद्यार्थ्यांना सतावत आहे.