'लाडक्यां’चा वेगाचा थरार, पाच महिन्यांत केवळ १७ केसेस दाखल

पुण्यातील घटनेनंतर शहरातही अल्पवयीन वाहनधारकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
bike
bikeSakal

विजय देऊळगावकर

शहराच्या कोणत्याही रस्त्यावर वाहनधारकांचे अवलोकन केल्यास दहापैकी एक तरी वाहनधारक अल्पवयीन दिसून येतो. आपल्या `लाडक्या लेका`ला दहावी, बारावी पास झाल्यास तुला बाईक घेऊन देतो, अशा प्रकारची पालकांची आमिषे अल्पवयीन वाहनधारकांना धोक्याच्या चक्रव्युहात पाठवतात. विशेष म्हणजे, वाहतूक शाखा याकडे सर्रास दुर्लक्ष करतात. त्यांच्या ‘चलता है’ वृत्तीमुळे अल्पवयीन वाहनधारकांविरुध्द चार महिन्यात केवळ १७ केसेस करण्यात आल्या आहेत.

पुण्यातील घटनेनंतर शहरातही अल्पवयीन वाहनधारकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आपल्या शहरातही रस्त्यावर, कोचिंग क्लासेस, शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात अल्पवयीन वाहनधारक आढळतात. कॅनाट गार्डन परिसरात तर स्पोर्टस बाईक चालवणारे अल्पवयीन हमखास दिसतात.

कॅनॉट परिसरात लावणार ब्रेक

कॅनॉट गार्डन परिसरात सिडको वाहतूक शाखा आणि सिडको पोलिस ठाण्याच्या पथकाने पाहणी केली. यामध्ये १२ ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यामुळे या रायडींग करणाऱ्या वाहनधारकांना आता ब्रेक लागणार आहे. पोलिस निरीक्षक अतुल येरमे, राजेश मयेकर आणि पथकाने ही पाहणी केली.

कारवाईत कोल्हापूर पुढे

अल्पवयीन वाहनधारकांवर कारवाईच्या बाबतीत छत्रपती संभाजीनगर वाहतूक पोलिस खूप पिछाडीवर आहेत. कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या १० टक्के कारवाईदेखील शहर पोलिसांकडून झालेली नाही. शहर वाहतूक शाखेचे चार विभाग असून देखील अल्पवयीन वाहनधारकांवरील कारवाईच्या बाबतीत पोलिसांची उदासिनता दिसून येते. दोन्ही शहरातील तफावत दाखवणारी आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.

bike
शिस्त दूरच; बेशिस्त वाढली! बंद दुभाजकांमुळे अनेक वाहनधारक राँग साइड

पालकांना होऊ शकतो कारावास

अल्पवयीन मुलाकडून अपघात झाल्यास आणि यामध्ये कोणी मृत्यूमुखी पडल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो. हा गुन्हा सिध्द झाल्यास पालकांना दहा वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे पालकांनीही अतिलाड न करता मुलांना समजावून सांगण्याची गरज आहे.

रील्स आणि स्टंटबाजीचे फॅड

शहरात अल्पवयीन मुलांमध्ये स्पोर्टस् बाईक वापरण्याचे फॅड मोठ्या प्रमाणात आहे. या बाईकचा वापर करीत स्टंटबाजी करीत रिल्स बनवण्याचे वेड देखील आहे. अत्यंत रॅश पध्दतीने ही मुले बाईक चालवत स्वतःचा आणि दुसऱ्याचा देखील जीव धोक्यात घालतात. विशेष करुन, कॅनॉट गार्डन परिसर, एन-३, एन-४, विद्यापीठ परिसर, रात्रीच्या सुमारास निराला बाजार परिसर, साई टेकडी आदी ठिकाणी ही मुले स्टंटबाजी करताना दिसून येतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com