पंढरपूर येथे अवैध गॅस रिफलिंग सेंटरवर छापा | Aurangabad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन सिलेंडरसह मोटर जप्त,एकास अटक
पंढरपूर येथे अवैध गॅस रिफलिंग सेंटरवर छापा, दोन सिलेंडरसह मोटर जप्त,एकास अटक .....

औरंगाबाद : पंढरपूर येथे अवैध गॅस रिफलिंग सेंटरवर छापा

वाळूजमहानगर : विनापरवाना व धोकादायकरित्या गॅस रिफलिंग सेंटरवर पुरवठा विभाग व वाळूज एमआयडीसी पोलीसांनी छापा टाकून, दोन गॅस सिंलेडरसह एक विद्युत मोटर जप्त करून एकास अटक करण्यात आली. ही कारवाई पंढरपुर येथील सलामपुरे नगर येथे शनिवारी (ता.२०) रोजी दुपारी करण्यात आली.

हेही वाचा: बाळापूर : शासकीय निवासस्थाने बनली खुराडे

पंढरपुर येथे अवैध रित्या गॅस रिफलिंग सुरू असल्याची माहिती मिळताच पुरवठा विभागाचे जिल्हा अधिकारी राजेंद्र शिंदे,न्यायब तहसिलदार शैलश राजमाने यांच्यासह वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक वसंत जिवडे, पोलीस नाईक धनेधर यांच्या पथकाने पंढरपुर येथील सलामपुरे नगर येथे छापा टाकला असता, तेथे एकजण गॅस रिफलिंग करतांना मिळून आला. त्यांनतर पथकाने तेथे असलेल्या लाल रंगाच्या दोन रिकाम्या गॅस टाक्या व एक विद्युत मोटर असा ९ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला.

तसेच या सेंटरवर काम करणारा ईकबाल बशिर शेख (४५) रा. कमळापूर यास ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे हे करीत आहे.

loading image
go to top