esakal | औरंगाबादेत पावसाच्या सरीवर सरी 
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबादेत पावसाच्या सरीवर सरी 

औरंगाबाद शहरात गुरुवारी चांगलाच जोरदार पाऊस झाला. त्यानंतर शुक्रवारी दुपारपासून पाऊस सुरु आहे.

औरंगाबादेत पावसाच्या सरीवर सरी 

sakal_logo
By
शेखलाल शेख


औरंगाबाद: शहरात गुरुवारी रात्री पावसाने जोरदार बॅटींग केल्यानंतर शुक्रवार (ता.१२) दुपारपासून शहरात पावसाच्या सरीवर सरी सुरु आहे. मृग नक्षत्रात जोरदार पाऊस झाल्याने नागरीकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात ३७.८६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर जिल्ह्यातील तब्बल ९ मंडळात अतिवृष्टी झाली. शहरातील उस्मानपुरा मंडळात ६८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

निसर्ग वादळानंतर औरंगाबाद शहरात गुरुवारी चांगलाच जोरदार पाऊस झाला. त्यानंतर शुक्रवारी दुपारपासून पाऊस सुरु आहे. सध्या अनलॉक मध्ये सम-विषम प्रमाणात दुकाने सुरु आहे. बाजारपेठेत सुद्धा गर्दी आहे. मात्र पावसामुळे बाजारपेठेतील गर्दी कमी झाली आहे.


जिल्ह्यात जोरदार पाऊस 

औरंगाबाद जिल्ह्यात गरुवारी सर्वदुर जोरदार पाऊस झाला. यामध्ये जिल्ह्यातील तब्बल ९ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. औरंगाबाद शहरातील उस्मानपुरा मंडळात ६८ मिलीमीटर पाऊस झाला. पैठण तालुक्यातील बिडकीन (८०), नांदर (६७), सिल्लोड तालुक्यातील अंभई (१०४), भराडी ६८), गोळेगाव (११४) तर सोयगाव तालुक्यातील सोयगाव (७८), बनोटी (८३) मिलीमीटर पाऊस झाला. 

 • औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपर्यंत तालुका निहाय पाऊस 
 •  
 • औरंगाबाद- ४३.६० 
 • फुलंब्री- ३६.७५ 
 • पैठण - ४२.२० 
 • सिल्लोड- ६६.६३ 
 • सोयगाव- ७१.६७ 
 • वैजापुर- १६.८० 
 • गंगापुर - २१.५६ 
 • कन्नड- १९.५० 
 • खुलताबाद- २२.०० 
loading image