esakal | कन्नडच्या देवगाव रंगारी परिसरात पावसाचा कहर, पिके चालली सडून | Aurangabad Rain Latest Updates
sakal

बोलून बातमी शोधा

देवगाव रंगारी (जि.औरंगाबाद) : अद्रकाच्या पिकात पावसाचे पाणी साचले आहे.

कन्नडच्या देवगाव रंगारी परिसरात पावसाचा कहर, पिके चालली सडून

sakal_logo
By
संतोष गंगवाल

देवगाव रंगारी (जि.औरंगाबाद) : देवगाव रंगारी (ता.कन्नड) (Kannad) येथे गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतात पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागात अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो, कापुस व मका, सोयाबीन, अद्रकची लागवड (Rain) केली होती. सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे शेतातून पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे शेताला तलावाचे (Aurangabad) स्वरुप आले आहे. यामुळे हातातोंडाशी आलेली पिके सडुन जात आहेत.

हेही वाचा: पैठण तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, पिकांचे प्रचंड नुकसान

शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरुच असल्याने तो हतबल झाला आहे. एवढे नुकसान होऊनही अद्याप पंचनामे केले जात नाही. सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करित आहेत.

loading image
go to top